भोंदूचा कारनामा…पहिले मोकळा हात दाखवला, मग हवेतून काजू कतली काढली आणि अशोक खरात म्हणाला…
अशोक खरात प्रकरण: महिला लैंगिक अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अशोक खरात (Ashok Kharat) याला दिलेली तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने आणि पुराव्यांची साखळी वाढत असल्याने, एसआयटी (SIT) पुन्हा एकदा अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पोलीस त्याला पुढील गुन्ह्यांत ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र या सुनावणीआधी या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काजू कतलीच्या चमत्काराने त्याचा सीए भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. हवेतून काजू कतली काढत सीए यांच्यावर अशोक खरातने अंधश्रद्धेचे जाळे टाकले. मोकळा असलेला हात सीए यांच्याकडे दाखवत अशोक खरातने काजू-कतली काढत हा घ्या प्रसाद…असं म्हणाला. 2017 मध्ये भोंदू खरातच्या भेटीसाठी आले असताना हातचालाकी करत सीए यांना अशोक खरातने चमत्कार दाखवले. तसेच आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेच्या बहानाने सीए यांच्याकडून कोट्यावधी रुपयेही अशोक खरातने उकळल्याचे समोर आले आहे. कोट्यावधी रुपये उकळत भोंदू खरातने केलेली फसवणूक पाहता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ashok Kharat Case)
अशोक खरात फार्महाऊसवरही महिलांसोबत नको नको ते करायचा- (Ashok Kharat Case)
अशोक खरातच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे, एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथकाच्या हाती लागले आहे. या व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत असून, यामुळे खरातच्या विरोधातील लैंगिक शोषणाचे गुन्हे अधिक प्रबळ झाले आहेत. एका सीएनेच कुकला फार्महाऊसवर तैनात करून खरातचे सर्व कारनामे उघड केले आहेत. आता या संशयास्पद व्हिडिओतून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.
अशोक खरातचं पोलीस कोठडीत नवीन नाटक- (Ashok Kharat Case)
महिला अत्याचाराच्या सहव्या गुन्ह्यात अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. यादरम्यान, अशोक खरात पुन्हा तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. आधी कोणतीही उत्तर न देणारा, उत्तरं देण्यास टाळाटाळ करणारा अशोक खरात आता काही आठवत नसल्याचे नाटक करत आहे. पोलीस तपासपासून सुटका करण्यासाठी अशोक खरातची ही गजनी ट्रिक चर्चेत आहे. याधी डोकं दुखत असल्याचं प्रकृती अस्वस्थ असल्याचा अशोक खरातने बहाणाही केला होता. (Ashok Kharat Nashik Case)
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Ashok Kharat: अशोक खरातचं कोठडीत नवीन नाटक; पोलीस तपासातून सुटका करण्यासाठी ‘गजनी’ ट्रिक
आणखी वाचा
Comments are closed.