रोनाल्ड ते डोनाल्ड; वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलचा काळा इतिहास, 45 वर्षानंतर पुन्हा गोळीबाराचा थरार
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील वॉशिंग्टन हिल्टन हॉटेल पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. 45 वर्षांपूर्वी याच हॉटेलबाहेर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. आता याच हॉटेलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज घुमल्याने अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या हाय-प्रोफाईल कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प, उपाराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासह पत्रकार, राजकारणी, सिनेकलाकार आणि दिग्गज उद्योजक असे जवळपास 2600 हून अधिक लोक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्याच्या बेतात असतानाच अचानक हॉटेलच्या लॉबीमध्ये अंदाधुंद गोळीबाराचा आवाज आला.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.