Salim Dola Detained in Istanbul – दाऊदचा हस्तक आणि ड्रग्ज माफिया सलीम डोला याला इस्तंबूलमध्ये अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक आणि कुख्यात ड्रग्ज माफिया सलीम डोला याला तुर्कियेतील इस्तंबूल शहरामध्ये अटक करण्यात आली आहे. तुर्कियेची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सलील डोला हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिम याचा जवळचा सहकारी असून हिंदुस्थानातील सर्वात मोठ्या सिंथेटिक ड्रग्ज निर्मिती आणि पुरवठा टोळीचा मुख्य सुत्रधार आहे. मुंबईतील एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणातही तो मुख्य आरोपी असून त्याच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई पोलिसांच्या विनंतीवरून ही नोटीस काढली होती. या नोटीसच्या आधारे तुर्कियेची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला बेड्या ठोकल्या.
युएईमार्गे प्रत्यार्पण?
हिंदुस्थानचा तुर्कियेसोबत थेट प्रत्यार्पण करार नाही. मात्र सलीम डोला याच्याकडे संयुक्त अरब अमिरातीचा पासपोर्ट आहे. त्यामुळे हिंदुस्थानी तपास यंत्रणाला त्याला तुर्कियेतून आधी युएई आणि त्यानंतर युएईमार्फत हिंदुस्थानात आणण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
Comments are closed.