IPL 2026 – दुखापतीनंतर लुंगी एनगिडीचा चाहत्यांसाठी पहिली मेसेज, म्हणाला…
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने भल्या मोठ्या लक्षाचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय साजरा केला. मात्र, या सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला दुखापती झाली आणि सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले. त्याला स्टेडियममधून थेट रुग्णालायत नेण्यात आलं. त्यामुळे चाहत्यांसह सर्वांचीच धाकधूक वाढली होती. विविध तर्क वितर्क लावले जात होते. मात्र, त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची तब्येत आता ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.
लुंगी एनगिडीला दुखापत झाल्यानंतर सर्वच स्तरातून तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करण्यात आली. तसेच कालपासून (25 एप्रिल 2026) त्याच्या पहिल्या प्रतिक्रियेची चाहत्यांसह सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज लुंगी एनगिडीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मेसेज टाईप करत सर्वांचे आभार मानले आहेत. “Thank You For The Messages All Good” असं त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे चाहत्यांचा जीव भांड्यात पडला असून. त्याने आता लवकरात लवकर मैदानात उतरून पुन्हा एकदा फलंदाजांच्या दांड्या गुल कराव्यात, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
Lungi Ngidi injury update – सीटी स्कॅनचे रिपोर्ट आले; लुंगी एनगिडीच्या प्रकृतीबाबत सर्वात मोठी अपडेट
दरम्यान, लुंगी एनगिडी हॉटेलमध्ये परतला असून त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सध्या त्याला दिल्ली फ्रेंचायझीच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तो आता मैदानात कधी उतरणार, याबद्दल साशंकता आहे.

Comments are closed.