IPL 2026 – “वैभव सूर्यवंशी माझा नवा आवडता खेळाडू”; पॅट कमिन्सने केले तोंडभरून कौतुक, म्हणाला…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलच्या अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 5 गडी राखून मात केली असली, तरी खरी चर्चा रंगली ती 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या शतकाची. राजस्थानकडून खेळताना वैभवने अवघ्या 37 चेंडूत 103 धावांची तोडफोड खेळी केली. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, मात्र वैभवने पहिल्याच षटकापासून षटकारांचा पाऊस पाडत हैदराबादच्या गोलंदाजांना जेरीस आणले.

सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्सने वैभवच्या खेळाचे तोंडभरून कौतुक केले. कमिन्स म्हणाला, “वैभव आता माझा नवा ‘फेव्हरेट’ खेळाडू आहे. तो चेंडूवर इतक्या जोरात प्रहार करतो की ते पाहणे खरोखरच मजेशीर आहे. एक गोलंदाज म्हणून त्याच्यासमोर खेळताना तुम्हाला तुमच्या टप्प्याबाबत अत्यंत अचूक असावे लागते, कारण थोडी जरी चूक झाली तर तो चेंडू सीमापार धाडतो. त्याच्या कारकिर्दीची ही सुरुवात जबरदस्त आहे आणि तो ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन खेळतो, ते मला खूप आवडले.” असं कमिन्स म्हणाला आहे.

IPL 2026 – दुखापतीनंतर लुंगी एनगिडीचा चाहत्यांसाठी पहिला मेसेज, म्हणाला…

दरम्यान, हैदराबादने 229 धावांचे मोठे लक्ष्य 9 चेंडू राखून गाठले. ईशान किशनने 74 आणि अभिषेक शर्माने 57 धावांची खेळी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी, वैभव सूर्यवंशीने आपल्या खेळीत 12 षटकार आणि 5 चौकार ठोकले, मात्र तो 14 व्या षटकात बाद झाल्यानंतर राजस्थानची धावगती मंदावली. कमिन्सने स्वतः या सामन्यात 4 षटकात केवळ 27 धावा देऊन 1 बळी घेतला आणि दुखापतीनंतर यशस्वी पुनरागमन केले.

Comments are closed.