क्रेडिट कार्ड आता तुमच्या मोबाईलवर! ग्राहकांसाठी पंजाब नॅशनल बँकेनं घेतला मोठा निर्णय

PNB किवी क्रेडिट कार्ड: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या सुमारे 18 कोटी ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट (Digital Payments) अधिक सुलभ करण्यासाठी फिनटेक कंपनी ‘कीवी’सोबत भागीदारी केली आहे. ‘कीवी’ हे एक क्रेडिट-ऑन-यूपीआय प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. या उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना यूपीआयद्वारे क्रेडिट सुविधा प्रदान करणे आणि त्यांच्यासाठी पेमेंटची ही पद्धत अधिक सोयीस्कर बनवणे हा आहे. पीएनबीने किवीच्या सहकार्याने यूपीआयवर क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना बँक बॅलन्स नसतानाही पेमेंट करता येईल.

ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात शिल्लक नसतानाही यूपीआयद्वारे पेमेंट करता येणार

दरम्यान, या उपक्रमाचा एक भाग म्हणून, बँक ‘रुपे’ (RuPay) नेटवर्कवर ‘पीएनबी कीवी क्रेडिट कार्ड’ सादर करणार आहे. यामुळं ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात शिल्लक नसतानाही यूपीआयद्वारे पेमेंट करता येईल.

वापरण्यास सोपे, शिवाय कॅशबॅक

हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असेल आणि UPI सोबत सहजपणे जोडले जाईल, ज्यामुळे पेमेंट करणे अधिक सोपे होईल. यावर ऑनलाइन व्यवहारांवर 0.5 ते 1.5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. याचा अर्थ वापरकर्त्यांना सोय आणि कॅशबॅक या दोन्हींचा फायदा होईल.

शुल्क मुक्त डिजिटल कार्ड

हे कार्ड पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जारी केले जाईल, ज्यामुळे ग्राहक घरबसल्या आरामात ऑनलाइन अर्ज करू शकतील. यामध्ये कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल, ज्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कार्डसाठी कोणतेही जॉइनिंग शुल्क किंवा वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही, ज्यामुळे ते सर्वसामान्यांसाठी आणखी सोयीस्कर ठरेल. दरमयान पंजाब नॅशनल बँकेनं क्रेडीट कार्डसंदर्भात घेतल्याल्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात शिल्लक नसतानाही यूपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे.

ग्रामीण भागात विस्तार करण्याची तयारी

पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक, बिभू प्रसाद महापात्रा म्हणतात की, देशात डिजिटल पेमेंट वेगाने वाढत आहे आणि यामध्ये UPI महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, बँकेचे देशभरात 10000 हून अधिक शाखांचे मजबूत जाळे आहे. यापैकी सुमारे 60 टक्के शाखा निमशहरी आणि ग्रामीण भागात आहेत. या नेटवर्कच्या माध्यमातून, बँक पूर्वी वंचित राहिलेल्या लोकांपर्यंत औपचारिक कर्जपुरवठा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

क्रेडिट कार्डचा वापर करा, 20 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

आणखी वाचा

Comments are closed.