आधी होमुर्झची नाकेबंदी उठवा, त्यानंतरच चर्चा करणार; इराण आपल्या भूमिकेवर ठाम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्याची अपेक्षा असतानाच आता फेरी होण्याची शक्यता धूसर होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 तासांचा विमानप्रवास शक्य नसल्याचे कारण देत अमेरिकी शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा रद्द केला. तर दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी आणि सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेत इस्लामाबाद दौरा संपवला. जोपर्यंत होमुर्झ सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी सुरू आहे, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले. तसेच इराण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अमेरिका आणि इराणच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढतच असून प्रति बॅरल १०५ डॉलरवर गेल्या आहेत. शांतता चर्चा वारंवार अयशस्वी होत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून अमेरिका-इराण चर्चा अयशस्वी ठरत असून गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जोपर्यंत आर्थिक आणि लॉजिस्टिकल निर्बंध कायम आहेत, तोपर्यंत इराणने अमेरिकेशी नवीन चर्चा करण्यास नकार दिला आहे. ‘बिझनेस टुडे’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत अमेरिकेने इराणी बंदरांवरील नाकेबंदी उठवली नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. त्यामुळे सध्या दोन्ही देशात तणाव वाढत आहे.

Comments are closed.