IPL 2026 – गिल आणि सुदर्शनची धडाकेबाज फलंदाजी, रोहित-इशानचा विक्रम मोडला; गुजरातचा चेन्नईवर 8 गडी राखून विजय
IPL 2026 च्या रोमांचक लढतीत गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 8 गडी राखून पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या होत्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 74 धावांची झुंजार खेळी केली, मात्र इतर फलंदाजांच्या अपयशामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरातच्या वतीने कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
चेन्नईने दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात दमदार झाली. सलामीवीर साई सुदर्शनने 46 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 87 धावांची आक्रमक खेळी केली. त्याला कर्णधार शुभमन गिल (33 धावा) आणि जोस बटलर (नाबाद 39 धावा) यांनी उत्तम साथ दिली. विशेष म्हणजे, गिल आणि सुदर्शन यांच्यातील ही 19 वी 50+ धावांची भागीदारी ठरली. विशेष म्हणजे या भागीदारीसह त्यांनी रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा विक्रम मोडीत काढला. गुजरातने हे लक्ष्य केवळ 16.4 षटकांत पूर्ण केले.
या विजयासह गुजरात टायटन्स आता आठ सामन्यांत चार विजयांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. दुसरीकडे, पराभवामुळे चेन्नईची संघ सहाव्या स्थानावर घसरला आहे. चेन्नईचा हा या हंगामातील पाचवी पराभव ठरला. आता गुजरातचा पुढचा सामना 30 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये आरसीबीविरुद्ध होईल, तर चेन्नईचा संघ 2 मे रोजी मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे.
Comments are closed.