Ratnagiri News – आरे वारे समुद्रकिनारी आढळला मृत व्हेल मासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे वारे समुद्रकिनाऱ्यावर एका महाकाय व्हेल माशाचा मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा मासा पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली.

रविवारी सायंकाळी सवा सातच्या सुमारास हा मृत व्हेल मासा काजीरभाटी किनाऱ्यावर दिसला. त्यानंतर कांदळवन अधिकाऱ्यांनी त्या माशाला बाहेर काढले. हा व्हेल मासा नेमका कोणत्या कारणाने मृत झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Comments are closed.