भंगाराने भरलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटलं, रस्त्यावरुन जाणाऱ्यारा चिरडलं, नागरिकांचा संताप

वसई अपघात : वसईतील धुमाळ नगर परिसरात शुक्रवारी रात्री एक दुर्दैवी अपघात घडला. भंगाराने भरलेल्या ट्रकखाली चिरडल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मृत व्यक्तीचे नाव बिंदर रामनारायण प्रजापती (वय 55) असे असून, रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास वजन काट्यासमोर हा अपघात झाला. पायी जात असताना भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक त्यांच्या अंगावरून गेला.

Vasai Accident Details : नियंत्रण सुटल्याने ट्रक अंगावरून गेला

मिळालेल्या माहितीनुसार, भंगाराने भरलेला ट्रक वजन काट्याकडे जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पादचाऱ्यावर गेला. ट्रकचे चाक दोन्ही पायांवरून गेल्याने बिंदर प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला.

Local Protest : संतप्त नागरिकांचा संताप उसळला

घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. संबंधित ट्रक हा एका नगरसेवकाशी संबंधित असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच घटनास्थळी आलेल्या नगरसेवकाने अपशब्द वापरल्याचाही आरोप करण्यात आला.

Police Clash : पोलिसांशी शाब्दिक चकमक

या प्रकारामुळे वातावरण तापले असून संतप्त नागरिक आणि पोलिस प्रशासन यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Vasai Traffic Issue : वाहतूक कोंडीमुळे वाढते अपघात

स्थानिकांच्या मते, या भागातील वजन काट्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीही येथे अनेक अपघात झाले असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून ट्रक चालकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.