रत्नागिरीत सवा तीन लाखाचा गुटखा आणि पानमसाला जप्त
गुटखा आणि पान मसाला विक्री करण्यासाठी रत्नागिरीत घेऊन येणाऱ्या एकाला रत्नागिरी षटक पोलिसांनी धाड टाकून पकडले.याकारवाईत पोलिसांनी ३ लाख २७ हजार ९०४ रुपयांचा गुटखा आणि पानमसाला पकडला असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिसांनी आज रत्नागिरीत एक इको गाडी पकडून त्यातील गुटखा आणि पानमसाला जप्त केला.शरद भंडारे रा.कोल्हापूर हा कोल्हापूर येथून गुटखा आणि पान मसाला घेऊन रत्नागिरीत येत होता.त्यावेळी शहर पोलिसांनी हि कारवाई केली.कारवाईत इको गाडी जप्त करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सागर शिंदे,राहुल जाधव,रणजित जाधव,शरद जाधव यांनी कारवाई केली.
Comments are closed.