सुनील नरेनची दादागिरी, रिंकू नावाचाही धमाका, लखनऊ पार थंडावला, सलग पाचवा पराभव, सुपर ओव्हरमध्ये
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स IPL 2026 : आयपीएल 2026 चा 38 वा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘पैसा वसूल’ ठरला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केले. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रिंकू सिंगच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा केल्या. एलएसकेनेही 20 षटकांत 8 गडी गमावून 155 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर शमीने कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर षटकार मारून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. यामुळे हा आयपीएल 2026 मधील पहिला सुपर ओव्हर सामना ठरला.
#KKR हंगामातील पहिला सुपर ओव्हर जिंका 🤩@kkriders टॉप्सी टर्व्ही क्रिकेटच्या 42 षटकांनंतर कष्टाने मिळवलेल्या विजयासह 👏
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/elFxwvCeWO#TATAIPL | #खेळबिंदास | #LSGvKKR pic.twitter.com/yIoX0vQOMv
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 26 एप्रिल 2026
सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
- लखनऊकडून निकोलस पूरन आणि एडन मार्कराम फलंदाजीसाठी आले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने गोलंदाजी सुनील नरेनकडे सोपवली.
- पहिल्याच चेंडूवर पूरन त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला.
- पंतने एक धाव काढली. त्यानंतर मार्करामने स्ट्राईक घेतली.
- तिसऱ्या चेंडूवर मार्करामने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि रिंकू सिंगने त्याचा झेल घेतला.
- सुपर ओव्हरमध्ये लखनऊच्या फलंदाजांना फक्त 1 धाव काढता आली, त्यामुळे केकेआरसमोर दोन धावांचे लक्ष्य राहिले.
- त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचे फलंदाज फलंदाजीसाठी आले. कर्णधार ऋषभ पंतने चेंडू प्रिन्स यादवकडे सोपवला.
- रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर एक शानदार चौकार मारून केकेआरचा विजय निश्चित केला.
मोहसिन खानचा कहर
कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात मोहसिन खानने टिम सायफर्टला शून्यावर बाद करून लखनऊला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे (10 धावा) आणि अंगकृष रघुवंशी (9 धावा) हे देखील खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकले नाहीत. एका बाजूने गडी बाद होत असताना कॅमेरून ग्रीनने 21 चेंडूत 34 धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोहसिन खानने त्यालाही माघारी धाडले. मध्यफळीतील रोवमन पॉवेल (1) आणि अनकुल रॉय (0) स्वस्तात बाद झाल्यामुळे कोलकात्याची स्थिती 6 बाद 73 अशी अत्यंत बिकट झाली होती. मोहसिन खानने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 23 धावा खर्च करत 5 महत्त्वाचे बळी घेतले.
रिंकू सिंगचा ‘वन मॅन शो’
कोलकात्याचा डाव 100 धावांच्या आत संपेल असे वाटत असताना रिंकू सिंग नावाचं वादळ आलं. त्याने 35 चेंडूंत नाबाद 83 धावांची स्फोटक खेळी केली. रिंकूच्या या खेळीत केवळ 1 चौकार होता, परंतु त्याने 7 षटकार ठोकले. त्याला शेवटच्या षटकांमध्ये सुनील नरेनने 4 धावा करून मोलाची साथ दिली. रिंकू आणि नरेन यांच्यात आठव्या विकेटसाठी 30 चेंडूत 62 धावांची नाबाद भागीदारी झाली, ज्यामुळे कोलकात्याला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. लखनऊकडून मोहसिन खान व्यतिरिक्त जॉर्ज लिंडेने 1 विकेट घेतला.
शेवटीच्या षटकांत फिरला सामना
156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवातही खराब झाली. मिचेल मार्श फक्त 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर एडन मार्करम (31) आणि कर्णधार ऋषभ पंत (42) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोलकात्याच्या फिरकीपटूंनी, विशेषतः वरुण चक्रवर्ती (3 बळी) आणि सुनील नरेन (2 बळी) यांनी मधल्या षटकांत धावांवर अंकुश लावला.
अखेरच्या षटकांत लखनऊने विकेट्स गमावल्या, पण मोहम्मद शमीने 6 चेंडूत 11 धावा करत सामन्यात जिवंत ठेवला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 7 धावांची गरज असताना मोहम्मद शमीने षटकार मारला आणि सामना सुपर ओव्हर’ मध्ये गेला. लखनऊने 20 षटकांत 8 बाद 155 धावा केल्या.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.