सबकुछ ठीकठाक है… एनगिडीचा चाहत्यांना दिलासा
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात लुंगी एनगिडी झेल टिपताना मागे कोसळला आणि त्याचे डोपं व मान जोरात आपटली. मैदानावर काही क्षण शांतता पसरली. त्याला तत्काळ स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. या घटनेनंतर एनगिडीने चाहत्यांना दिलासा देत ‘मेसेजसाठी धन्यवाद, मी ठीक आहे’ असा संदेश दिला. दिल्लीतील बीएलके-मॅक्स रुग्णालयात उपचारानंतर त्याला कोणताही धोका नसल्याने सुट्टी देण्यात आली.
हा प्रसंग पंजाबच्या डावातील तिसऱया षटकात, अक्षर पटेलच्या चेंडूवर प्रियांश आर्याच्या फटक्यावर घडला. सामना दहा मिनिटे थांबला; नंतर बदली खेळाडू घेतला गेला. संघ व्यवस्थापनाने दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. सात सामन्यांत सात विकेट घेणाऱया एनगिडीच्या अनुपस्थितीने दिल्लीची गोलंदाजी कमपुवत भासली आणि त्याच्या अनुपस्थितीचा संघाच्या कामगिरीवरही फरक जाणवला.
Comments are closed.