अस्वच्छ शौचालयांमुळे प्रवाशाला त्रास, रेल्वेला बसला 60 हजारांचा भुर्दंड
एसी ट्रेनमधील अस्वच्छ शौचालयांबाबत तक्रार मिळूनही त्याकडे कानाडोळा करणे रेल्वे प्रशासनाला चांगलेच महागात पडले आहे. 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीनंतर ग्राहक विवाद निवारण आयोगाने रेल्वेला दणका देत 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सुरिंदर कुमार मुन्शी असे या तक्रारदाराचे नाव असून त्यांनी प्रवासादरम्यान झालेल्या त्रासाबद्दल भरपाई मिळण्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये तक्रार दाखल केली होती. सुरिंदर मुन्शी हे न्यू चंदीगड येथील रहिवासी आहेत. त्यांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली सफदरजंग ते वांद्रे टर्मिनस या प्रवासासाठी जम्मू तावी ते वांद्रे टर्मिनस स्पेशल ट्रेनमध्ये एसी-3 टायर कन्फर्म बर्थ बुक केला होता. बी-1 कोचमधील सर्व शौचालये अस्वच्छ आणि वापरण्यायोग्य नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी टीटीईकडे वारंवार तक्रार केली. मात्र साफसफाईचे फक्त आश्वासन मिळाले. 24 तासांहून अधिक काळ मूलभूत स्वच्छता सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मुन्शी यांना शारीरिक अस्वस्थता, मानसिक छळ आणि मनस्ताप सहन करावा लागला.
अखेर दोन वर्षांनी न्या
आयोगाकडून रेल्वेला 60 हजारांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये तक्रारदाराला मानसिक त्रास, छळ आणि खटल्याच्या खर्चापोटी 30 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच 15 हजार रुपये आयोगाच्या ‘लीगल एड अकाउंट’मध्ये आणि 15 हजार रुपये ‘ट्रायसिटी कन्झ्युमर कोर्ट बार असोसिएशन’मध्ये जमा करावेत असे निर्देश दिले आहेत.
Comments are closed.