‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीकडून NRI तरुणाची 9 कोटींची फसवणूक; लग्न करुयात सांगून लुटलं
बिग बॉस फेम अभिनेत्री आशु रेड्डी फसवणुकीचा गुन्हा दाखल ‘बिग बॉस’च्या(Bigg Boss) घरात झळकलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री (Actress) सध्या एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीनं एका एनआरआयला लग्नाचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीनं (Bigg Boss Fame Actress) लग्नाचं आमिष दाखवून NRI सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून पैसे उकळून त्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘बिग बॉस तेलुगू’ फेम अभिनेत्री आशू रेड्डी (Bigg Boss Telugu Fame Actress Ashu Reddy) हिच्याविरोधात हैदराबादमधील सेंट्रल क्राईम स्टेशन (CCS) मध्ये फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीनं NRI सॉफ्टवेअर इंजिनिअरला (Software Engineer) कोट्यवधींचा गंडा घातलाय. लग्नाची स्वप्न दाखवून NRI सॉफ्टवेअर इंजिनिअरला अभिनेत्रीनं 9.35 कोटींची फसवणूक केली आहे.
परदेशात राहणाऱ्या सत्यनारायण नावाच्या एका व्यक्तीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा लंडनमध्ये वास्तव्यास आहे. त्यांच्या मुलाची आणि अभिनेत्रीची भेट 2018 मध्ये झाली होती. हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि अभिनेत्रीनं त्याच्याशी लग्न करण्याचं वचनही दिलं.
अभिनेत्रीवर NRI भारतीय व्यक्तीची फसवणूक केल्याचा आरोप (Actress Accused Of Defrauding An NRI)
NRI तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आता अभिनेत्री खोटं बोलत असून तिनं त्यांच्या मुलाला दिलेल्या लग्नाच्या आश्वासनांपासून माघार घेतली आहे. त्या व्यक्तीच्या वडिलांनी अभिनेत्रीवर लग्नाचं आमिष दाखवून आपल्या मुलाची फसवणूक केल्याचा आणि कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार, NRI तरुणानं अभिनेत्रीसाठी अनेक आलिशान गाड्या, अनेक अपार्टमेंट्स आणि 5 किलो सोनं खरेदी केलं आहे.
अभिनेत्रीच्या बहिणीनंही घेतलं लाखोंचं कर्ज
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आशु रेड्डीच्या बहिणीनंही NRI तरुणाकडून तब्बल 50 लाख रुपयांचं कर्ज घेतले होतं. पण, तिनं ही रक्कम कधीच परत केली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर, अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तक्रारदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. तिनं म्हटलंय की, ती तिच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या खोट्या गोष्टींवर कठोर कारवाई करणार आहे.
‘सियासत डेली’च्या एका रिपोर्टनुसार, हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दोघेही ‘लिव्ह-इन’मध्ये राहत असल्याचं भासत होतं. पण, दोघांमधील आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.