दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मोहनलाल आणि मामुटी 13 वर्षांनंतर ‘पॅट्रियट’ च्या निमित्ताने एकत्र
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोहनलाल आणि ममूटी यांची जोडगोळी जगभरात प्रसिद्ध आहे. या दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, पण गेल्या काही वर्षांत मात्र ते एकत्र दिसले नाहीत. ‘पॅट्रियट’ची घोषणा झाल्यापासून चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. परंतु अलीकडेच ममूटी यांनी दिलेल्या अपडेटमुळे बाॅलिवुडच्या चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, ममूटी यांनी स्पष्ट केले की ‘पॅट्रियट’ हा पॅन-इंडिया चित्रपट नसून, तो फक्त मल्याळी प्रेक्षकांसाठी असणार आहे. खूप काळानंतर ममूटी आणि मोहनलाल हे दोन सुपरस्टार एकत्र येत असल्याने, या चित्रपटाचे बजेट देखील मोठे आहे. एका पत्रकार परिषदेत ममूटी म्हणाले, “हा चित्रपट मल्याळी भाषिकांसाठी बनवला आहे. पण केरळबाहेरील प्रेक्षकांनाही तो आवडण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे मुख्य लक्ष केरळच्या लोकांवर आहे. त्यामुळे हा पॅन-इंडिया चित्रपट नाही. ‘पॅट्रियट’ एक गेम-चेंजर ठरू शकतो.
Tv 9 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यात ममूटी आणि मोहनलाल यांचे अनेक अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत. यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हिंदुस्थान सरकारने दोन्ही अभिनेत्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. मोहनलाल यांना पाच वेळा, तर ममूटी यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Comments are closed.