Chhatrapati Sambhajinagar – आठवडी बाजार बंद करण्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सत्ता येताच भाजपने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले. यावेळी उपनेते सुभाष पाटील, बाळासाहेब थोरात, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आदी उपस्थित होते.
अंबादास दानवे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आंदोलनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. पारंपारिक आठवडी बाजार बंद करून संबंधित जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आठवडी बाजार बंद करण्याच्या
विरोधात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आंदोलन pic.twitter.com/nRRvpp79pq— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 27 एप्रिल 2026
महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पारंपारिक व्यवस्थेला धक्का बसणार असून याचा फटका सामान्य विक्रेते आणि नागरिकांना बसणार असल्याची टीका अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केली. बिल्डरांचे हित जपण्यासाठीच सामान्य जनतेच्या हक्काचे बाजार बंद केले जात असल्याचा आरोप करत दानवे यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Comments are closed.