तुम्ही 80 वर्षाच्या आहात, हे भांडण्याचे वय नाही…; संजय कपूर यांच्या आईला सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे पती आणि उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संजय कपूर यांची आई राणी कपूर यांना एक सल्ला दिला आहे.
तुम्ही आता 80 वर्षांच्या आहात, न्यायालयीन लढाई दीर्घकाळ चालते, हे भांडणाचे वय नाही. न्यायालयातील लढाया दीर्घकाळ चालवणे हे कोणाच्याच हिताचे ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सेटलमेंट करण्याचा सल्ला दिला. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि विजय बिष्णोई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयाने संजय यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर आणि इतर 22 जणांकडून याप्रकरणी उत्तर मागवले आहे. तसेच, हा कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी हाच योग्य मार्ग ठरू शकतो, असे सुचवत न्यायालयाने सामंजस्याने वाद मिटवण्यावर भर दिला.
Comments are closed.