GK : भारतात 3 तर अमेरिकेत 4 पातींचा पंखा वापरतात, असे का?
गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या तडाख्यामुळे महाराष्ट्र चांगलाच होरपळून निघतो आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट सदृशस्थिती निर्माण झाली आहे. अशा वाढत्या गरमीत थंड हवा मिळावी यासाठी आपण AC, Cooler आणि पंख्याचा वापर करतो. हल्ली बऱ्याचजणांकडे जरी AC असला तरी विजबिल कमी येत असल्याने आजही भारतातील अनेक घरात पंख्याचा वापर सर्रासपणे केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत घरातील सर्वाधिक उपकरणे म्हणजे पंखा (Ceiling Fan). आपल्या घरात असणाऱ्या पंखाला तीन पाती असतात हे तुम्ही पाहिलंच असेल. परंतू अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात चार पातींचा पंखा असतो. असं का? आज आपण यामागील कारणे काय आहे हे पाहणार आहोत.
पंख्याला पाती असण्यामागेचे शास्त्रीय कारण

पंख्याला 3 किंवा 4 पाती असण्यामागे शास्त्रीय कारण आहे. अनेकांच्या मते पंख्याला जितक्या जास्त पाती तितकी हवा जास्त मात्र असे अजिबात नाही. याउलट पंख्याच्या पात्यांची संख्या जास्त असल्यामुळे हवा कमी होते. त्यामुळे पंख्याच्या पात्याची संख्या जितकी कमी तितकी हवा जास्त लागते.
3 आणि 4 पातीतील फरक
भारतातील बरेच प्रदेश हे उष्णवातावरणीय आहे. काही भागात तर 40 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. त्यामुळे अशा वातावरणात जास्त गतीने फिरणारा फॅनची गरज असते. मात्र, अमेरिकतील वातावरण थंड असते, उन्हाळ्यातही तेथे जास्त गरम होत नाही. त्यामुळे तेथे कमी गतीने फिरणारा फॅन असेल तरी चालतो. दुसरे कारण म्हणजे अमेरिकेसारख्या देशात एअर कंडिशनरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. ज्यामुळे फॅनची आवश्यकता जास्त भासत नाही. तसेच जितक्या पंख्याला पाती कमी तितक्या पंख्याचा आवाज येत नाही आणि शांतताही मिळते. त्यामुळे भारतात हवेसाठी 3 तर अमेरिकेत 4 पातींचा पंखा वापरला जातो.
हेही वाचा – Garbage Van : घंटा गाडीला मागे बाहुली का लावतात? वाचा यामागील रंजक कारण
Comments are closed.