अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, तात्काळ शिक्षेला स्थगिती
नितेश राणे बातम्या : मंत्री नितेश राणे यांच्यासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कणकवली मध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिखलफेक प्रकरणातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र 504 गुन्ह्याखाली नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि दुरावस्थेसाठी उपअभियंता प्रकाश शेडेकर याच्यावर चिखलफेक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना जुलै 2019 मध्ये उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती. त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. यातील 504 कलमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास व 1 लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे. तर इतर सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज करण्यात आला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी, माझगाव न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
आणखी वाचा
Comments are closed.