अमेरिकेने फिलीपिन्सला रशियाकडून तेल खरेदी करण्याची दिली परवानगी, काय आहे कारण?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, हिंदुस्थानपाठोपाठ आता फिलिपिन्सलाही रशियाकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासाठी मुदतवाढ (Waiver) दिली आहे.

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे विशेषतः हॉर्मुझची सामुद्रधुनी यांसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवर परिणाम झाला आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक पंचमांश पुरवठा याच मार्गावरून होतो. या संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊन कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी आणि जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता राखण्यासाठी अमेरिकेने रशियावरील निर्बंधांमध्ये तात्पुरती शिथिलता दिली आहे.

फिलिपिन्सच्या ऊर्जा सचिव शॅरॉन गॅरिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेकडे विशेष सवलतीची मागणी करण्यात आली होती. फिलिपिन्सला आपली ऊर्जा संसाधने वाढवायची करायची असून, केवळ एका देशावर अवलंबून राहणे टाळण्यासाठी रशियाचा पर्याय खुला ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी ही सवलत ११ एप्रिल रोजी संपली होती. मात्र अमेरिकेने याची मदत वाढवली आहे.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपूर्वीच अमेरिकेने हिंदुस्थानाला समुद्रमार्गे येणारे रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची विशेष सवलत दिली होती. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले असले, तरी सध्याच्या पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक स्तरावर तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी ट्रम्प प्रशासनाने ही सवलत दिली असल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed.