ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अनेक टीव्ही मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे आज निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. शीव रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

सत्तर ते नव्वदच्या दशकात भरत कपूर यांनी अनेक चित्रपटांत काम केले होते. खलनायक आणि पोलीस अधिका-यांच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी नूरी, राम बलराम, लव्ह स्टोरी, बझार, गुलामी, आखिरी रास्ता, सत्यमेव जयते, स्वर्ग, खुदा गवाह, रंग, बरसात आणि साजन चले ससुराल सारख्या चित्रपटांतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. चित्रपटांशिवाय कॅम्पस, परंपरा, राहत, सांस, अमानत आणि कहानी चंद्रकांता की यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही ते झळकले होते.

Comments are closed.