Travel: Aesthetic Vibes साठी मुंबईतील ‘हे’ फोटोस्पॉट तरुणाईमध्ये हिट




‘खोताची वाडी’ तरुणाईचं नवं फोटोस्पॉट


हल्लीच्या जनरेशनमध्ये एक ट्रेंड कॉमन आहे तो म्हणजे छान Aesthetic फोटो काढण्यासाठी खास ठिकाणं शोधणं! Instagram reels, cute photos आणि vintage vibes साठी तरुणाई सतत नवीन लोकेशन्स शोधत असते. आणि अशातच मुंबईतलं एक छोटंसं, शांत पण खूपच सुंदर ठिकाण अचानक सगळ्यांचं फेव्हरेट बनलं आहे ते म्हणजे खोताची वाडी.

गर्दीच्या आणि उंच इमारतींच्या मुंबईत ही वाडी म्हणजे जणू जुन्या काळात नेणारी एक वेगळीच दुनिया. अरुंद गल्ल्या, रंगीबेरंगी घरे आणि शांत     वातावरणामुळे हे ठिकाण आज तरुणांसाठी “Perfect Aesthetic Photo Spot” बनलं आहे.

इतिहास आणि खास ओळख
खोताची वाडी ही केवळ फोटो काढण्याची जागा नाही, तर ती मुंबईच्या समृद्ध इतिहासाचा एक भाग आहे. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात खोत कुटुंबाच्या नावावरून या वाडीची स्थापना झाली. सुरुवातीला येथे ईस्ट इंडियन आणि कॅथलिक समुदायातील लोक राहत होते आणि त्यांनी आजही आपली परंपरा, संस्कृती आणि जीवनशैली जपून ठेवली आहे. म्हणूनच या भागाला “हेरिटेज व्हिलेज” म्हणून ओळखलं जातं. जुन्या मुंबईची झलक अनुभवायची असेल, तर ही वाडी एकदम परफेक्ट ठिकाण आहे.

Aesthetic फोटोसाठी परफेक्ट स्पॉट
या वाडीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथली पोर्तुगीज शैलीतील रंगीबेरंगी घरे. लाकडी बाल्कनी, कोरीव खिडक्या, अरुंद गल्ल्या आणि vintage look हे सगळं मिळून एकदम Instagram Worthy Background देतं. म्हणूनच हल्ली अनेक influencers, photographers आणि तरुण इथे खास फोटोशूटसाठी येताना दिसतात. प्रत्येक कोपरा इतका सुंदर आहे की, कुठेही उभं राहिलं तरी फोटो aestheticच येतो.

कसं पोहोचाल?
खोताची वाडी ही मुंबईच्या गिरगाव भागात आहे. जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे Charni Road Railway Station, जेथून ही वाडी फक्त 10-15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बस, टॅक्सी किंवा ऑटोनेही इथे सहज पोहोचता येतं.



Comments are closed.