Summer Health : उन्हात बाहेर पडताना काय काळजी घ्यावी?
गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या तडाख्यामुळे महाराष्ट्र चांगलाच होरपळून निघतो आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट सदृशस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आरोग्यविभागाकडून पुढील काही दिवस सगळ्यांनीच आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले जात आहे कारण या तापमानात डिहायड्रेशन किंवा उष्माघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कुठेही बाहेर जाताना काही गोष्टींची काळजी नक्की घ्यायला हवी.
घराबाहेर पडण्यापूर्वी एक-दोन ग्लास पाणी नक्की प्या. पण पाणी पिऊन लगेच चालू नये.
बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.
जर तुमचे काम बाहेर जास्त वेळ असेल तुमचा संपर्क सतत उष्णतेशी होत असल्यास लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा ओआरएसचे सेवन करावे.
उष्णतेत शक्यतो सुती आणि हलके कपडे परिधान करावेत. हे कपडे घाम शोषून घेतात आणि त्वचेला चिकटत नाहीत.
गडद रंगाचे कपडे घालू नका, हे कपडे उष्णता अधिक शोषतात.
डोक्यावर टोपी किंवा रुमाल नक्की बांधावा.
हेही वाचा – Itchy skin: घामामुळे सतत खाज येते? करू शकता हे घरगुती उपाय
डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या गुणवत्तेचा गॉगल वापरा.
सध्या प्रखर ऊन असल्याने नेहमी छत्री सोबत ठेवाय
रस्त्याने शक्यतो सावलीतून चाला.
रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका यामुळे लवकर थकवा येऊ शकतो किंवा चक्कर येऊ शकते.
कितीही घाई असेल तरी काहीतरी हलका नाश्ता करूनच बाहेर पडावे.
प्रवासात गरमी जास्त जाणवत असेल तर मान आणि चेहऱ्यावर ओला रूमाल फिरवा. यामुळे थंडावा जाणवेल.
शक्यतो 1 ते 4 मध्ये बाहेर पडू नका, या काळात सूर्याची किरणे अधिक तीव्र असतात.
बॅगेत ‘इमर्जन्सी किट’ ठेवू शकता, ज्यात पाण्याची बाटली, वेट वाइप्स आणि सॅनिटायझर असेल.
हेही वाचा – उन्हाळा आणि किडनी व युरिनरी इन्फेक्शन
Comments are closed.