सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने केली होती 'ही' ऐतिहासिक कामगिरी; 18 वर्षांनंतरही आयपीएलचा हा विक्रम अबाधित!

आयपीएलमधील सर्वात कमी वेळेत संपलेल्या सामन्यांचा जेव्हा कधी उल्लेख होतो, तेव्हा २००८ च्या आयपीएलमध्ये बनलेल्या एका विक्रमाची चर्चा नक्कीच होते. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता. हा महाविक्रम दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघही मोडीत काढू शकला नाही.

​मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अवघ्या ६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. सचिन तेंडुलकरच्या संघाने हा सामना फक्त ५.३ षटकांत (ओव्हर्स) संपवून विजय मिळवला होता.

​रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त ७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला होता. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने ६.३ षटकांतच हा सामना आपल्या नावावर केला.

​कोच्चि टस्कर्स केरळचा संघ आयपीएल २०११ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला होता. महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखालील कोच्चि टस्कर्स केरळने अवघ्या ७.२ षटकांत हा सामना जिंकला होता.

​पंजाब किंग्सचा संघ आयपीएल २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. तिथे ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने ७.५ षटकांत हे लक्ष्य गाठले होते.

​सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध ६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला होता. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने अवघ्या ८ षटकांत विजय नोंदवला होता.

Comments are closed.