जागतिक तेल बाजारात खळबळ! UAE ची OPEC मधून बाहेर पडण्याची घोषणा, इराण-अमेरिका संघर्षाच्या सावटात मोठा निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) तेल उत्पादक देशांचा गट असलेल्या ओपेक (OPEC) आणि ओपेक प्लस मधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यूएईच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १ मे पासून यूएई या दोन्ही संघटनांचे सदस्यत्व सोडणार आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारावर याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.

यूएईच्या ऊर्जा मंत्र्यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पेट्रोलियम क्षेत्र आणि भविष्यातील इतर रणनीतींचा काळजीपूर्वक आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात जगाला अधिक उर्जेची गरज भासणार असून मागणीतही वाढ होईल, हे लक्षात घेता हा धोरणात्मक निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सध्याच्या अडथळ्यांमुळे तेल बाजार आधीच अस्थिर आहे. त्यामुळे बाजारावर अधिक परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय आता घेण्यात आला आहे.

सौदी अरेबियाला मोठा धक्का

इराण युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता यांच्या दरम्यान युएईचे बाहेर पडणे हे तेल निर्यातदार गट आणि त्यांचे प्रमुख नेतृत्व असलेल्या सौदी अरेबियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. युएईसारखा जुना सदस्य बाहेर पडल्याने ओपेकमधील अंतर्गत मतभेद आता उघड झाले असून, या गटाची शक्ती कमकुवत होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.