ह्रदयद्रावक… मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदीत उडी; कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू

चंद्रपूर : कपडे धुण्यासाठी वर्धा (Chandrapur) नदी नदीवर गेलेल्या तिघांचा वर्धा नदीच्या (River) पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ असलेल्या वर्धा नदीच्या घाटावरील ही घटना असून या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतकांमध्ये राजू कोडापे (40), त्यांची मुलगी अर्पिता कोडापे (12) आणि भाची प्रियांका मडावी (14 वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदी पात्राकडे धाव घेतली. त्यानंतर, पोलीस (Police) आणि प्रशासनाला माहिती देण्यात आली असून बुडालेल्यांसाठी शोधमोहिम राबविण्यात येत आहे.

पुण्यातील जुन्नर येथे आजच शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली होता. आता, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवरही तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या दरम्यान 6 ते 7 जण कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी, मृतकांपैकी दोन मुली आंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे अचानक त्या बुडू लागल्या, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडिल राजू कोडापे यांनीही नदीपात्रात उडी घेतली, मात्र त्यांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली आहे. मात्र, मृतदेहांचा अद्याप शोध लागलेला नाही. संध्याकाळ झाल्यामुळे आज शोधमोहीम थांबवण्यात आली असून उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामस्थ व नातेवाईकांनी नदी पात्राजवळ गर्दी केली होती.

हेही वाचा

पुण्यातील जुन्नरमध्ये मोठी दुर्घटना! शेततळ्यात बुडून दोन चिमुकले दगावले; गावावर शोककळा, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो

आणखी वाचा

Comments are closed.