नैरोबीत १ मे रोजी घुमणार ‘जय जय महाराष्ट्र’, कोकणातील जाखडी आणि नमनातील लोकगीतांचा रंगमंचावर राज्यातील साठ जणांमध्ये रत्नागिरीतील दोघे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोनियातील नैरोबीमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनी “गर्जा महाराष्ट्र” चा आवाज घुमणार आहे. महाराष्ट्रातून ६० जण या नैरोबीत दोन दिवस चालणाऱ्या कोमसापच्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत. यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचा चमू कोकणातील लोककला नमन आणि जाखडीतील गीते सादर करणार आहेत. रत्नागिरीतील कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि रत्नागिरी शाखा उपाध्यक्ष विनायक हातखंबकर सहभागी होणार आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने १ व २ मे रोजी नैरोबी येथे दुसरे आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे. याकार्यक्रमात महाराष्ट्रातील ६० जण सहभागी होणार आहेत. त्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचा एक चमू आहे.महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कोकण मराठी साहित्य परिषदेचा चमू “गर्जा महाराष्ट्र” हे महाराष्ट्र गीत सादर करणार आहेत.त्याचबरोबर कोकणातील लोककलांचा जागर नैरोबीच्या रंगमंचावर होणार आहे.”गणा धाव रे,गणा पाव रे”, श्रावण बाळ जातो काशीला या जाखडीतील लोकगीतांचा आवाज घुमणार आहे.जाखडीतील लोकगीते सादर होणार आहे.त्याचबरोबर नैरोबीतील मराठी माणसांना नमनातील लोकगीत ऐकायला मिळणार आहेत.” अहो पयलं नमनं गणपती देवाला,दुसरं नमन धरतरी मातेला,गणपती आला नाचून गेला,नटवा रे बाबा मागून आला”, अशी नमनातील लोकप्रिय गीते सादर होणार आहेत.

स्वामी स्वरूपानंदाची प्रार्थना सादर होणार

नैरोबी येथील महाराष्ट्र दिन कार्यक्रमात रत्नागिरीतील कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि रत्नागिरी शाखा उपाध्यक्ष विनायक हातखंबकर सहभागी होणार आहेत. विनायक हातखंबकर हे १ मे रोजी कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वामी स्वरूपानंद यांची प्रार्थना सादर करणार आहेत. नमिता कीर या गर्जा महाराष्ट्र या महाराष्ट्र गीताच्या समूहगायनात सहभागी होणार आहेत. सर्वजण महाराष्ट्रीयन पोषाखात सहभागी होणार असून २ मे रोजी नैरोबीत ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे.

Comments are closed.