Kokan News – रत्नागिरी – नागपूर महामार्गवरील मुर्शी जवळ डिझेल टँकरचा अपघात; चालक जखमी

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर मार्गांवरील मुर्शी जवळील गोवरेवाडी बस थांब्याजवळ डिझेल टँकर पलटी होऊन मंगळवारी दुपारी हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सुरेश आनंदा पवार (३९) राहणार बेडग ता. मिरज जि. सांगली हा आपल्या ताब्यातील डिझेल टँकर एम एच 10 सी आर 5184 मिरज ते रत्नागिरी ( एस टी डेपो रत्नागिरी ) असा घेऊन जात असताना मुर्शी पोलीस चौकीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दुपारी साडे बाराच्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने टॅंकर पलटी झाला. रस्त्यावरच हा अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात टॅंकरमधील डिझेल वाहून गेले. या अपघातात सुरेश आनंदा पवार हे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी कुर्ले -पावसकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अनर्थ टाळला. पोलीस कार्यवाही सुरु आहे.

Comments are closed.