भाजपची विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर
येत्या १२ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपली उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत भाजपने पाच जणांच्या नावांची घोषणा केली आहे.
भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नावांमध्ये सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांचा समावेश आहे. पक्षाने विविध भागांतील आणि संघटनात्मक कामाचा अनुभव असलेल्या नेत्यांना यावेळी संधी दिली आहे. दरम्यान, विधानपरिषदेच्या एकूण १० जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी १२ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.
Comments are closed.