महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, मला खुश कर…
जळगाव: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिलांवरील (Women) अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आधी नाशिकमधील अशोक खरात प्रकरण पुढे आल्यानंतर, येथीलच एका आयटी कंपनीत महिलांवर दबाव टाकून लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता, जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या बांभोरी येथील ॲस्टोमो कंपनीतही अशाच प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शरीर सुखाची मागणी करत कर्मचारी महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून जनार्दन नामक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर धरणगाव पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडिती महिलेने तिच्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागितली असता अधिकाऱ्याने महिलेकडे शरिरसुखाची मागणी करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
”तू खूप सुंदर आहे, मला तू आवडते, तू मला खुश कर, मी तुला दोन दिवस काय दहा दिवसाच्या सुट्ट्या देईन आणि पगारही कापणार नाही,” असे म्हणून अधिकाऱ्याने पीडितेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. पीडितेने या कृत्याचा प्रतिकार केला असता, अधिकाऱ्याने तिला कानशिलात लगावून जमिनीवर पाडले आणि अश्लील चाळे केले. माझ्या ओळखीचे गुंड आणि राजकारणी आहेत, जर तू कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकीही संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
अधिकाऱ्याने या घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून पीडितेला गप्प करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओची धमकी देत अधिकाऱ्याने पीडितेला कंपनीत कामासाठी ज्या नवीन मुली येतात, त्यांना तू मला खुश करण्यासाठी मनव, तू माझे हे काम केले तर मी तुला त्रास देणार नाही, असे काम करायला सांगितल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सात महिन्यांनंतर पीडितेने हिंमत एकवटून कुटुंबासह धरणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप आरोपी अधिकाऱ्याला अटक झालेली नसून तो फरार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस अण्णासाहेब घोलप यांनी म्हटलं आहे.
मीरा रोडवरील हल्याच्या घटनेवरुन पडळकरांचा संताप
मी मीरा रोड येथील तरुणावर चाकू हल्ल्याने वार करण्यात आलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो, देवेंद्र फडणवीस राज्याचे अत्यंत सक्षम गृहमंत्री व मुख्यमंत्री आहेत. ज्याने हे नीच कृत्य केले आहेत त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार सक्षम आहे. या घटनेच्या पाठीमागे कोण, या सर्वांचे धागेदोरे तपासण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली आहे. धर्म विचारून वार करणं म्हणजे यांची मग्रुरी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, ही मग्रुरी आता थांबवावी लागेल. दिवसेंदिवस अशा घटना करण्याचा प्लॅन या लोकांचा आहे, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. लव जिहाद, कार्पोरेट जिहाद, लँड जिहाद, वॉट जिहाद, ज्यूस जिहाद, आता हे नवीनच प्रकरण समोर आलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालेलं आहे की धर्म विचारून वार करण्यात आले आहेत. त्यावर नक्की कठोरातली कठोर कारवाई होईल, चिंता करण्याची बाब नाही, असेही पडळकर म्हणाले.
हेही वाचा
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
आणखी वाचा
Comments are closed.