रशियात सत्तांतराचे वारे? पुतिन यांच्या विरोधात अंतर्गत बंडाळी, वर्षभरात सत्ता जाऊ शकते; माजी समर्थकाचा खळबळजनक दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक अत्यंत धक्कादायक दावा समोर आला आहे. पुतिन यांचे माजी समर्थक इल्या रेमेस्लो यांनी दावा केला आहे की, पुतिन यांचे अत्यंत जवळचे लोकच आता त्यांचा तिरस्कार करू लागले असून, येत्या वर्षभरात रशियामध्ये सत्तापालट होऊ शकतो. पत्रकार क्सेनिया सोबचक यांना दिलेल्या मुलाखतीत रेमेस्लो यांनी रशियातील सद्यस्थितीवर भाष्य करताना हे विधान केले आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

रेमेस्लो म्हणाले आहेत की, रशियातील सध्याच्या सर्व समस्यांना थेट पुतिन जबाबदार आहेत. २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीपर्यंत रशियात मोठे राजकीय बदल पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, हे बदल हिंसक नसून १९५३ मध्ये स्टालिनच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे शांततेत सत्तांतर झाले होते, तसेच ते घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी रशियन यंत्रणेतील लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी घाबरू नये आणि योग्य वेळी बदलासाठी साथ द्यावी.

पुतिन यांच्यानंतर रशियाचे नेतृत्व कोण करू शकेल, याबाबत रेमेस्लो यांनी तीन नावांचा उल्लेख केला आहे. यामध्ये पंतप्रधान मिखाइल मिशुस्टिन, आर्थिक विकास मंत्री मॅक्सिम रेशेतनिकोव आणि पुतिन यांचे माजी अंगरक्षक एलेक्सी ड्यूमिन यांचा समावेश आहे. एलेक्सी ड्यूमिन यांना बऱ्याच काळापासून पुतिन यांचे उत्तराधिकारी मानले जात आहे.

रेमेस्लो यांनी म्हटले आहे की, रशियातील अनेक मोठे नेते पुतिन यांच्यावर नाराज आहेत. कारण त्यांना पूर्वीसारखी ताकद आणि सोयी-सुविधा आता मिळत नाहीत. रेमेस्लो हे स्वतः पूर्वी पुतिन यांचे समर्थक होत. परंतु मार्चमध्ये त्यांनी पुतिन यांना युद्धखोर आणि खोटे म्हटले होते. त्यानंतर त्यांना मानसिक रुग्णालयातही ठेवण्यात आले होते,.जी सरकारची दबाव टाकण्याची एक कृती असल्याचे बोलले जाते.

Comments are closed.