अनिल अंबानींना ईडीचा झटका; फार्महाऊस, अन् कोट्यवधींचे शेअर्स सगळंच हातातून गेलं; जप्तीची कारवाई
अनिल अंबानी ईडी नवी दिल्ली: अनिल अंबानींच्या RCOM कंपनी बँक फसवणूक प्रकरणसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने दुसऱ्या शब्दांत ईडीने (ED – Enforcement Directorate) रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCom) ‘बँक फसवणूक’ प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या अंतर्गत 3, 034.9 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रिलायन्स अनिल अंबानी (Anil Ambani ED) समूहाच्या प्रकरणांमध्ये ईडीने जप्त केलेल्या एकूण मालमत्तेचे मूल्य आता 19,344 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपासातून बँक आणि सार्वजनिक निधीचा कथित गैरवापर तसेच मनी लाँडरिंग उघडकीस येत आहे. तर आरकॉम बँक फसवणूक प्रकरणी ईडीकडून 3,035 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे.
Anil Ambani Group Case: अनिल अंबानींना मोठा धक्का, ईडीकडून 3,035 कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई: उषा किरण बिल्डिंगमधील फ्लॅट.
पुणे: खंडाळा येथील फार्महाऊस.
अहमदाबाद: साणंद येथील जमिनीचा तुकडा.
ED Action on Anil Ambani : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे 7.71 कोटी शेअर्स
ईडीच्या तपासात ‘प्रमोटर ग्रुप’च्या ( Promoter Group) काही मालमत्ता उघडकीस आल्या आहेत. यामध्ये मुंबईतील ‘उषा किरण’ इमारतीमधील एक फ्लॅट, खंडाळा (पुणे) येथील एक फार्महाऊस आणि अहमदाबादमधील सानंद येथील जमिनीच्या एका तुकड्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ‘RiseE Trust’ (अनिल अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा एक खाजगी कौटुंबिक ट्रस्ट) या छत्राखालील अनिल अंबानी यांच्या समूहाचाच एक भाग असलेल्या ‘Risee Infinity Pvt. Ltd.’ कंपनीच्या मालकीचे, ‘Reliance Infrastructure Ltd.’ चे 7.71 कोटी समभाग (शेअर्स) देखील जप्त करण्यात आले.
‘RiseE Trust’ ची स्थापना ही मालमत्तांचे एकत्रीकरण करून संपत्तीचे जतन आणि संसाधनांची निर्मिती सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. तसेच, ‘RCom’ ला मंजूर करण्यात आलेल्या कर्जांच्या बदल्यात कर्जदात्या बँकांना अनिल अंबानी यांनी दिलेल्या वैयक्तिक हमींच्या (personal guarantees) स्वरूपातील त्यांच्या वैयक्तिक दायित्वांपासून या मालमत्तांचे संरक्षण करणे, हा देखील या ट्रस्ट स्थापनेमागील एक उद्देश होता,’ असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.