राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या ब

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) अनुषंगाने रात्री उशिरा बैठक पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे. काल (मंगळवारी, ता २८) रात्री ११ ते २ पर्यंत देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडल्याची माहिती आहे.(Vidhan Parishad Election 2026)

त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीला माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे देखील उपस्थित होते. विक्रम काकडे हे खासदार पार्थ पवार यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला पक्षात सध्या प्रचंड विरोध होत असल्यामुळे अन्य नावांबाबत देखील बैठकीत खलबतं झाल्याची माहिती आहे. पक्षातून राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, झिशान सिद्धकी यांच्या नावांबाबत देखील चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. रात्री उशिरा चर्चा पार पडल्यानंतर थोड्याच वेळात देवगिरी निवासस्थानी थोड्याच वेळात पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती आहे. (Vidhan Parishad Election 2026)

देवगिरी निवासस्थानी आज (बुधवार, ता २९) कोअर कमिटीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे पोहचले, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह काही नेते बैठकीला पोहचले आहेत. आजच्या बैठकीत उमेदवाराच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.(Vidhan Parishad Election 2026)

Maharashtra Vidhan Parishad Election : एका जागेसाठी रस्सीखेच

पक्षातून राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, झिशान सिद्धकी यांच्या नावांबाबत देखील चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तर झिशान सिद्दीकी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर राजेंद्र जैन पक्षाचे माजी विधान परिषद आमदार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत.

पक्षाच्या आजच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतं आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार

उद्धव ठाकरे (शिवसेना – ठाकरे)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)

Vidhan Parishad Byelection 2026 : विधान परिषदेची पोटनिवडणूक

प्रज्ञा सातव

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.