खिल्लीच बनली गुरुकिल्ली; तू करू शकत नाही याच वाक्याने पेटला श्रेयस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्रेयस अय्यरच्या कारकीर्दीला वळण देणारी गोष्ट म्हणजे त्याच्यावर झालेली खिल्ली. ‘तू या परिस्थितीत टिकू शकत नाहीस, शॉर्ट चेंडू तुझी कमजोरी आहे, अशा टोमण्यांनी त्याला खचवले नाही, उलट पेटवले. हाच उपहास त्याची गुरुकिल्ली ठरली आणि त्याने स्वतःलाच दिलेले आव्हान स्वीकारत आपला खेळ पूर्णपणे बदलून टाकला.

टीका ऐकली की मनात एकच ठिणगी पडते, त्यांना चुकीचे सिद्ध करायचेय. क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर खेळताना ‘हे शक्य नाही’ हे शब्द त्याला अजिबात मान्य नव्हते. म्हणूनच प्रत्येक वेळी तो स्वतःलाच अधिक ढकलत राहिला, अशा श्रेयसच्या भावना होत्या.

एकेकाळी ज्याच्यावरून त्याची खिल्ली उडवली जात होती तोच शॉर्ट चेंडू आता त्याचे हत्यार बनला आहे. आधी बचाव करणारा अय्यर आता त्याच चेंडूला प्रेक्षकांत पाठवतो. त्या टीकेने मला उकसवले. मी मेहनत घेतली आणि त्यांना प्रत्युत्तर दिले, हे त्याचे विधान त्याच्या बदलाची साक्ष देते.

पाठीच्या दुखापतीनंतरही अनेकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते, पण अय्यरने मानसिकता बदलत स्वतःला अधिक मजबूत केले. तू परत येऊ शकणार नाहीस, या वाक्यालाच त्याने आव्हान दिले आणि पुनरागमन अधिक धारदार केले.

50 षटके आणि 300 पेक्षा अधिक चेंडू-असा कडक सराव, विविध गोलंदाजांचा सामना आणि सूर मिळवण्यासाठी धडपड. यामुळे अय्यरचा खेळ अधिक स्थिर आणि आक्रमक झाला. आता तो फक्त फलंदाज नाही, तर सामना फिरवणारा खेळाडू आणि नेतृत्व करणारा कर्णधार बनला आहे.

Comments are closed.