संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिय
बीड मस्साजोग निवडणूक निकाल 2026: मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत आश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर आता यावर धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभव मान्य करून नवनिर्वाचित सरपंचाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत संतोष अण्णा देशमुख (Santosh Deshmukh) यांचे गावासाठी असलेली व्हिजन घेऊन काम करणार असल्याचे ते म्हणाले. माझं आणि गावाचं संतोष अण्णा असताना जे कॉम्बिनेशन होतं, ते नीट राहिले नाही. संतोष अण्णांना न्याय मिळवून देण्यासाठी मला, कुटुंबाला आणि गावाला, सगळ्या लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्ती मला वेळ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात दिल्लीपर्यंत जायची वेळ आली आहे. भविष्यातही जावं लागणार आहे. गावकऱ्यांना मला वेळ देणं झाला नाही, हे ही पराभवाचे कारण आहे. आता आमचा राजकीय वाद संपला आहे. आता आम्ही पुढे जाणार आहोत. गावच्या विकासाठी आम्ही मदत करायला तयार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. (Maharashtra Politics news)
गेल्या 15 दिवसांपासून मस्साजोगामध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु होता. या निवडणुकीसाठी स्वरुपानंद देशमुख आणि अश्विनी देशमुख या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीसाठी काल मतदान झाले आणि आज सकाळी मतमोजणी झाली. स्वरुपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) यांचा 92 मतांनी पराभव करत या निवडणुकीत बाजी मारली. या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीच्या फॅक्टरचा फायदा होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आणि स्वरुपानंद देशमुख विजयी झाले. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच स्वरुपानंद देशमुख यांनी मोठी आघाडी घेतली. पहिली, दुसरी आणि तिसरी अशा मतमोजणीच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये स्वरुपानंद देशमुख आघाडीवर होते. सरतेशेवटी त्यांनी 92 मतांनी विजय प्राप्त केला.
Navnath Waghmare on Massajog Election Result: धनंजय देशमुख जरांगेच्या नादाला लागल्याने पराभव: नवनाथ वाघमारे
धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्या नादाला लागल्यामुळेच अश्विनी देशमुख यांचा मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली. हा पराभव मनोज जरांगे , खासदार बजरंग सोनवणे तसेच जातीयवादी विचारसरणीच्या लोकांचा आहे. ग्रामपंचायतीनंतर धनंजय देशमुख यांना जिल्हा परिषदेचे डोहाळे लागले होते. धनंजय देशमुख मनोज जरांगेच्या आसपास राहून जातीय द्वेषाचे राजकारण करू लागल्यामुळेच दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला.
धनंजय देशमुख यांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेचे डोहाळे लागले होते. मात्र, मस्साजोगच्या लोकांनी जातीय आणि भावनिक राजकारण बाजूला सारून स्वरूपानंद देशमुख यांना निवडून दिले. त्यामुळे हा पराभव केवळ देशमुख कुटुंबाचा नाही तर मनोज जरांगे आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा असल्याचे वाघमारे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.