IPL 2026 – … म्हणून मुंबई इंडियन्सचा संघ SRH विरुद्ध दंडावर काळी फित बांधून मैदानात उतरला
इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सामना रंगला. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे खेळाडू दंडाला काळी फित बांधून मैदानात उतरले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याच्या मुलीचे अकाली निधन झाले आहे. या दुःखद घटनेमुळे त्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी संघाने हा निर्णय घेतला आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने एका निवेदनाद्वारे अधिकृत माहिती दिली. आमच्या सपोर्ट स्टाफच्या मुलीच्या अकाली निधन झाले आहे. त्या कुटुंबाच्या स्मरणार्थ आणि एकोपा दर्शवण्यासाठी खेळाडू दंडाला काळी फित बांधून उतरणार आहेत, अशी नाही मुंबई फ्रॅंचाईझीने दिला.
दरम्यान, आयपीएल 2026 च्या प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या गुणतालिकेत चुरस असून नेट रन रेट देखील महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईच्या नजरा हार्दिक पंड्याचे नेतृत्व, सूर्यकुमार यादवची फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आहेत. तर दुसरीकडे, हैदराबादचा संघ त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
Comments are closed.