काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्या 10 जागांमधील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार उर्वरित 9 जागांपैकी एक जागा महाविकास आघाडी निवडून आणू शकते. या एका जागेसाठी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCPSP) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लढावं यासाठी आग्रह धरला होता. मात्र, शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांच्या नावाची एकतर्फी घोषणा करण्यात आली. यामुळं काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार देणार असून राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला होता, आता पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा काँग्रेसनं दिला पाहिजे,अशी भावना काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज
काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून देण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीत परस्पर उमेदवार जाहीर केला, प्रत्येकवेळी शिवसेना अशीच वागणार हे चालणार नाही, अशी भूमिका काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून मांडण्यात आली आहे.
काँग्रेसचा राष्ट्रवादीची 10 मतं मिळवण्याचा प्रयत्न
काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासोबत चर्चा करण्यात येणार आहे. काँग्रेसचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 10 मतं मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देण्यात आला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहाखातर बारामतीतला उमेदवार मागे घेतला होता, अशी भूमिका काँग्रेसची असल्यास समोर येत आहे. आता राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा द्यावा अशी भावना काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून ए फॉर्म मुंबईला रवाना
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे A फॅार्म देण्यात आला आहे. A फॅार्म मुंबईत पाठवण्याची जबाबदारी श्रीनिवास बिक्कड यांच्यावर देण्यात आली आहे. बिक्कड यांनी कांग्रेस मुख्यालयातून A फॅार्म घेतला असल्याची माहिती आङे. श्रीनिवास बिक्कड A फॅार्म घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत. तर, मुंबईतच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ B फॅार्म देणार आहेत.
मविआत फूट
राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीतील तीन पक्ष आग्रही होते. मात्र, शरद पवार निवडणूक लढवणार असल्यानं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना पाठिंबा दिला होता. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर मविआतील फूट समोर आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.