Abdominal Massage : विविध आजारांना दूर ठेवेल 5 मिनिटांची पोटाची मालिश





पोट हे आपल्या शरीराचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. पोटामुळेच आपल्या शरीराच्या जवळजवळ सर्व क्रिया होतात. मग जेवण पचवण्यापासून ते ऊर्जा मिळेपर्यंत सर्व कार्य पोट करते. त्यामुळे पोटाचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर पोटाची मालिश करणे गरजेचे आहे. भारतात फार पूर्वीपासून पोटाची मालिश केली जाते. आजच्या लेखात जाणून घेऊयात पोटाची मालिश करण्याचे फायदे आणि ती कशी करावी?

बद्धकोष्ठतेपासून आराम

बद्धकोष्ठता हा एक सर्वसामान्य आजार आहे. यात पोट साफ होत नाही. तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम हवा असल्यास तुम्ही दररोज कोमट तेलाने पोटाचे मालिश करायला हवी. असे केल्याने पोट चांगल्या पद्धतीने साफ होईल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.

मानसिक तणावापासून मुक्तता

जे लोक कायम मानसिक तणावाखाली असतात, त्यांनी रोज हलक्या हाताने पोटाची मालिश करावे, फायदा होईल.

पचनक्रिया सुधारते

रोज देशी तूप लावून पोटाची मालिश केल्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. त्यासोबतच आपण जे काही खातो, पितो ते आपल्या अंगी देखील लागते.

लठ्ठपणावर प्रभावी

लठ्ठपणा ही सध्याच्या घडीला एक गंभीर समस्या झाली आहे. भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यत ही समस्या जाणवत आहे. त्यामुळे लठ्ठपणा कमी करायचा असल्यास दररोज पोटाची मालिश करणे फायद्याचे ठरेल.  दररोज पोटाला मालिश केल्याने अनावश्यक चरबी वेगाने कमी होत जाते.

मालिश कशी कराल?

  • पाठीवर झोपा. पोटावर थोडे बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावावे.
  • बेंबीच्या सभोवताली घड्याळाच्या दिशेने हळुवार हाताने गोल फिरवत मालिश करावी.
  • पोटाच्या खालच्या उजव्या बाजूकडून वरती, नंतर छातीखाली आडवे आणि डाव्या बाजूने खाली अशा प्रकारे मालिश करावी.
  • एक लक्षात घ्या, पोटाची मालिश करताना पोटावर जोरात दाब देऊ नये.

हेही वाचा – Summer Health : उन्हात बाहेर पडताना काय काळजी घ्यावी?



Comments are closed.