अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मानखुर्दच्या ट्रॅफिकमध्ये 5 तास अडकली, नेमकं काय घडलं?
मुंबईसारख्या शहरामध्ये वाहतूक कोंडी ही कुणालाच नवीन नाही.परंतु अनेकदा तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकल्याने, महत्त्वाच्या ठिकाणी कामाला जाण्यास उशीर होतो. नुकताच असाच एक वाहतूक कोंडीचा प्रकार मानखुर्दमध्ये घडला होता. मानखुर्द येथील वातहूक कोंडीत सीनियर सोनाली कुलकर्णी अडकल्याचा व्हिडीओ तिने शेअर केला. तब्बल पाच तास सोनाली कुलकर्णी मानखुर्दमधील वाहतूक कोंडीत अडकली होती. मुख्य म्हणजे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने, मागे परतण्याचाही पर्याय शिल्लक नव्हता.
रात्रीच्या सुमारास सोनीलीने तिच्या इन्स्टाग्रामवरून या वाहतूक कोंडीचा व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली. मंगळवारी रात्री मानखुर्द येथे रस्त्याच्या कामासाठी उभ्या असलेल्या क्रेनचा भाग कोसळला. यामध्ये एका नागरिकाला जीव गमवावा लागला. याच क्रेनचा भाग काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याने, मानखुर्द सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने अडकून पडल्याने, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
Mumbai News – मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाची पायलिंग रिंग कोसळली, दुर्घटनेत पोलीस हवालदाराचा मृत्यू
सोनालीने एक व्हिडीओ करत ती पाच तास या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचे सांगितले. मानखुर्द ब्रिजवरील वाहतूक कोंडीमध्ये ती पाच तास अडकल्याचे तिने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “नमस्कार, मी आत्ता मानखुर्द ब्रिजवर असून, 5 तास झाले असून मी याठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये अडकल्ये. मी पुण्याला चालले होते…पण, इथेच अडकले. सोनालीने हा व्हिडीओ टाकताच, अनेकांनी या वाहतूक कोंडीबद्दल संताप व्यक्त केला.
Comments are closed.