Home Cleaning Tips: ‘या’ ट्रीक्सने काही मिनिटांत घर होईल चकाचक
आपण सगळेच म्हणतो “आज साफ करेन…” पण काम, थकवा आणि आळस यामुळे घर आवरणं पुढे ढकललं जातं. आणि मग एक दिवस अचानक लक्षात येतं घरात पसारा वाढलाय. पण पाहिलं तर घर स्वच्छ ठेवण्यासाठी खूप वेळ किंवा मेहनत लागत नाही, तर लागतात काही स्मार्ट सवयी. रोज थोडं-थोडं लक्ष दिलं, तर तुमचं घर कायम स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसन्न राहू शकतं. चला तर मग, जाणून घेऊया काही सोप्या आणि प्रभावी टिप्स. (easy home cleaning tips to keep home clean daily)
1) दैनंदिन स्वच्छतेच्या सवयी
अंथरुण लगेच आवरा:
सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटं देऊन अंथरूण आवरलं, की संपूर्ण खोली नीट दिसते आणि दिवसाची सुरुवातही पॉझिटिव्ह होते.
'जाता तसे स्वच्छ करा' पद्धत:
स्वयंपाक करताना किंवा कोणतंही काम करताना वापरलेल्या वस्तू लगेच जागेवर ठेवा. भांडी साचू दिली की काम दुप्पट होतं.
पसारा लगेच आवरा:
कपडे, बॅग, पुस्तके जिथे-तिथे टाकण्याऐवजी लगेच त्यांच्या जागी ठेवा. ही छोटी सवय मोठा फरक करते.
रात्री किचन स्वच्छ ठेवा:
झोपण्यापूर्वी किचन कट्टा आणि सिंक साफ करून ठेवलं, की सकाळी फ्रेश वाटतं आणि दिवस छान सुरू होतो.
२) स्मार्ट आणि सोप्या क्लिनिंग ट्रिक्स
बेकिंग सोडा + व्हिनेगर:
हट्टी डाग काढण्यासाठी हे कॉम्बिनेशन खूप प्रभावी आहे. गॅस, सिंक किंवा बाथरूम क्लिनिंगसाठी बेस्ट!
मायक्रोफायबर कापड वापरा:
टीव्ही, काच किंवा फर्निचर पुसताना मायक्रोफायबर कापड वापरल्यास धूळ पटकन निघते आणि डागही राहत नाहीत.
कचरा दररोज पैसे:
ओला आणि सुका कचरा रोज बाहेर टाकल्याने दुर्गंधी आणि जंतूंचा त्रास कमी होतो.
'वन इन, वन आउट' नियम:
नवीन वस्तू आणली की एक जुनी वस्तू घरातून काढा. यामुळे अनावश्यक पसारा वाढत नाही.
3) साप्ताहिक नियोजन
खोलीनुसार साफसफाई:
एकाच दिवशी पूर्ण घर साफ करण्यापेक्षा दर आठवड्याला एक-एक भाग निवडून डीप क्लिनिंग करा. यामुळे काम सोपं आणि manageable होतं.
टाकाऊ वस्तू काढून टाका:
जुनी वर्तमानपत्रं, रिकामे बॉक्स, न वापरणारे सामान वेळोवेळी बाहेर काढा. घर जितकं नीटनेटकं, तितकं शांत आणि सुंदर वाटतं.
Comments are closed.