Ratnagiri News – देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक, रिक्षाचालकाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाट्यावर प्रवाशांची वाट बघत उभी असलेल्या रिक्षाला गुरुवारी सकाळी अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. या धडकेत रिक्षात बसलेला चालक रिक्षाबाहेर फेकला गेला. यात जमिनीवर आदळून त्याचा जागीच मृत्यू झाला. विजय पांडुरंग कांबळे (62) असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे.
कांबळे हे नेहमीप्रमाणे रत्नागिरी-नागपूर रस्त्यावरील देवळे फाटा येथे रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट बघत होते. यावेळी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. यात रिक्षाचा मागच्या बाजूचा चेंदामेंदा झाला असून कांबळे यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर रिक्षा दहा फूट पुढे फरपटत नेली. अज्ञात स्कॉर्पिओ वाहनाने धडक देऊन आपली गाडी पुन्हा रिव्हर्स घेतली आणि कोल्हापूरच्या दिशेने सुसाट घेऊन गेला.
Comments are closed.