21 उपायुक्तांच्या बदल्या

बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 21 पोलीस उपायुक्तांच्या बदलीचे आदेश आज महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाकडून जारी करण्यात आले.

विविध जिह्यांतील पोलीस अधीक्षक, उप आयुक्त, तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. बदल्यांमध्ये अजय के. बन्सल यांची जालना येथून सायबर सुरक्षा विभागात बदली करण्यात आली असून सिग्रुजी विशाल आनंद यांना अमरावती (ग्रामीण) येथून धुळे येथे पाठवण्यात आले आहे. तसेच बाळासाहेब पाटील यांची नाशिक (ग्रामीण) येथून मुंबई शहरात उप आयुक्त म्हणून बदली केली आहे. सोमनाथ घार्गे यांना आहिल्यानगरहून सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदावर बदली देण्यात आली आहे. याशिवाय  रवींद्रसिंह परदेशी (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), संदीप घुगे (मुंबई शहर), श्रवण दत्त (सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, आस्थापना), मुम्मका सुदर्शन (अहिल्या नगर, अधीक्षक), धोंडोपंत स्वामी (अधीक्षक, नाशिक ग्रामीण), अनुज तारे (अमली पदार्थविरोधी टास्क पर्ह्स), अनुराग जैन (मुंबई शहर), अश्विनी सानप (अधीक्षक, नंदुरबार), तेगबीर संधू (अधीक्षक, जालना), राजकुमार शिंदे (लोहमार्ग, पुणे), निकेश खाटमोडे (वाशीम, अधीक्षक), आयुष नोपानी (अधीक्षक, चंदपूर), पंकज कुमावत (अधीक्षक, परभणी), निकेतन कदम (अधीक्षक, अमरावती ग्रामीण), सुरेश गुंजाल (अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव), गजानन राजमाने (मुंबई शहर), दत्ता तोटेवाड (अपर पोलीस अधीक्षक, अमरावती) यांची बदली करून नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Comments are closed.