Maharashtra News Live Updates: मुंबईतील 227 वॉर्डमध्ये आज
Maharashtra News Live Updates: आज 1 मे महाराष्ट्र दिन… महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील सरकारी इमारती, प्रशासकीय कार्यालयं आणि ऐतिहासिक वास्तूंना सजावट करण्यात आलीये. सरकारी इमारती तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्यात…आज 1 मेचा दिवस अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मोठं यश आल्यानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीची, शौर्याची आणि अभिमानाची आठवण म्हणून 1 मे ला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो…दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईतील 227 वॉर्डमध्ये आज "जय जय महाराष्ट्र"चा नारा घुमणार आहे….यावेळी शाहीर साबळे यांच्याद्वारे गायलेल्या महाराष्ट्र गीताचे लाऊड स्पीकरवर वादन केले जाणार आहे.
Comments are closed.