IPL 2026 – गुजरातने बंगळुरूला रोखले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गुजरातच्या अर्शद खान, जेसन होल्डर आणि राशीद खान यांच्या प्रभावी माऱ्यापुढे बंगळुरूचा संघ 19.2 षटकांत 155 धावांतच आटोपला आणि त्यानंतर शुभमन गिल आणि जॉस बटलर यांच्या फटकेबाजीने गुजरातला 16 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. दोन विकेट आणि 3 झेल टिपणारा जेसन होल्डर ‘सामनावीर’ ठरला.

बंगळुरूने गुजरातविरुद्धचा घरातला सामना सहज जिंकला होता आणि गुजरातने त्या अपयशाचा वचपा काढता परतीचा सामना जिंकला. गुजरातच्या गोलंदाजीसमोर आज बंगळुरूसाठी विराट कोहली (28) आणि देवदत्त पडिक्कल (40) या दोघांनाच समाधानकारक खेळ करता आला. उर्वरित फलंदाजांना गुजरातच्या गोलंदाजांचा नीटपणे सामनाही करता आला नाही. शंभरीत 6 फलंदाज बाद झाल्यानंतर तळाच्या तिन्ही फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त फटकेबाजीमुळे आरसीबीला 155 पर्यंत आपला स्कोर वाढवता आला, पण गुजरातने या आव्हानाचा अक्षरशः फडशा पाडला. गुजरातने विकेट गमावल्या असल्या तरी आव्हान फारच कमी असल्यामुळे गुजरातने आपला पाचवा विजय मिळवण्यात यश मिळवले.

Comments are closed.