बीपीसीएल, युनियन बँक उपांत्यपूर्व फेरीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बंड्या मारुती सेवा मंडळाने अमृत महोत्सव आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या अखिल हिंदुस्थानी कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम, हिंदुस्थानी नौदल आणि युनियन बँकेने दोन्ही साखळी सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच आयएसपीएल, ओएनजीसी, दक्षिण-मध्य रेल्वे या संघांनीही अंतिम आठ संघांत स्थान मिळवले. आता  उपांत्य फेरी गाठण्यासाठी ओएनजीसी विरुद्ध युनियन बँक, दक्षिण-मध्य रेल्वे विरुद्ध हिंदुस्थानी नौदल अशा लढती रंगतील. जयपूर कब्स आणि यूपी योद्धा, मुंबई बंदर विरुद्ध तामीळनाडू क्लब यांच्यात उपउपांत्यपूर्व लढती होतील.

ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर प्रो-कबड्डीला साजेसे आयोजन करणाऱ्या बंडय़ा मारुती सेवा मंडळाच्या मेहनतीवर सारेच कबड्डीप्रेमी फिदा झाले. तसेच आजच्या लढतींवरही प्रेक्षक फिदा होते. ओएनजीसी आणि आयएसपीएल यांच्यातील संघर्ष 38-37 असा संपला, तर बीपीसीएलने दक्षिण-मध्य रेल्वेचे कडवे आव्हान 53-52 असे रोखले. नौदलाने मुंबई बंदरवर 53-45 अशी मात केली तर जयपूर कब्सने रेड आर्मीचा 41-15 असा पाडाव केला.

Comments are closed.