सहर शेखनंतर आता BMC मधील एमआयएमची नगरसेविका अडचणीत; जात प्रमाणपत्र अवैध, नगरसेवक पद धोक्यात, न

मुंबई: मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील एआयएमआयएमच्या नगरसेविका (mim corporator) रोशन इरफान शेख (roshan sheikh) यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणी दरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे शेख यांचे नगरसेवक पद जाण्याची शक्यता निर्माण झाली असून एआयएमआयएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय संबंधितांकडून घेतला जाणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल आठ नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमला हा मोठा फटका असल्याचं बोललं जात आहे.(mim corporator roshan sheikh caste certificate invalid)

दरम्यान, शेख यांचे पद रद्द झाल्यास दुसऱ्या क्रमांकावर मते मिळवणारे मोहम्मद महफूज शेख यांना नगरसेवक पदाची संधी मिळू शकते. रोशन शेख या प्रभाग क्रमांक १३८ मधून निवडून आल्या होत्या. मानखुर्द – शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक १३८ मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे परभणी येथील जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३८ ‘इतर मागासवर्गीय’ (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून रोशन शेख यांनी २०२६ च्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता.

त्यानंतर त्यांनी जुलाह (इतर मागासवर्ग) जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी परभणीच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार मोहम्मद महफूज शेख यांनी रोशन शेख यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिले होते. त्यामुळे हे प्रकरण परभणी येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वर्ग करण्यात आलेले होते. तेथील समितीने हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यामुळे आता एमआयएमसह नगरसेविकेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय.

MIM Corporator : नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

या प्रकरणी महम्मद मेहफूज शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि निवडणूक विभागाला पत्र पाठवून शेख यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. रोशन शेख यांचे जातप्रमाण पत्र समितीने अवैध ठरवून जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे रोशन मोहम्मद सलीम शेख यांना अपात्र ठरवून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रभागातून समाजवादी पक्षाचे मोहम्मद महफूज शेख यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अर्जून शिंदे आहेत. महापालिका सभागृहात रोशन शेख यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा झाल्यास त्या दिवसापासून मोहम्मत महफूज शेख नगरसेवक होतील अशी शक्यता आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.