Ratnagiri news – मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे येथे उभ्या ट्रकला कारची धडक; एक वर्षांच्या चिमुकलीसह 6 जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे येथे उभ्या असलेल्या ट्रकला सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनॉर कारने मागून धडक दिली. हा अपघात शुक्रवारी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे येथील एसएमएस हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक के ए ०२ एजी २०२५ गाडीला मुंबईतील भांडुप येथून मालवणच्या दिशेने जात असलेल्या वॅगनार कार क्रमांक एम एच ०३ एफसी ११४५ कारने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी कार्यरत विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थ सुजित शिंदे व शुभम यांच्या मदतीने जखमींना त्वरित मदत करण्यात आली.
जयेश राज शर्मा (वय – 27, नवी मुंबई), आशा श्रीनिवास नायडू (वय – 80, भांडुप), सुरेखा संतोष परब (वय – 48, भांडुप), तीर्थ जितेंद्र ठाकूर (वय – 18 भांडुप), प्रिया श्रीनिवास नायडू (वय – 1 वर्ष, भांडुप) आणि योगिता सतीश नायडू (वय 38, भांडुप) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना तातडीने यश मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे उपचार सुरू करण्यास मोठी मदत झाली.
Comments are closed.