परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांचे हृदयविकारच्या झटक्याने निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते सुरेश जेथलिया यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकारचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास सुरेशकुमार जेथलिया यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्यो मालवली. त्यांच्या निधनाने जालना जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पोकळी निर्माण झाली असून परतूर-मंठा परिसरावर शोककळा पसरली आहे.

Comments are closed.