Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे

मराठी On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे

एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमदेवार न देण्याचं कारण अंतरआत्म्यातून आवाज आला उमदेवार देऊन म्हटल्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर एकनाथ शिंदे यांनी आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का?  मी पहिल्यांदा ऐकलं आहे, 2019 ला अंतरआत्मा कुठं होतं. आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरआत्म्यातून आवाज येतो का असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होत आहे, बिनविरोध निवडणूक होत आहे आणि त्यामुळं सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे. सर्व पक्षांना धन्यवाद दिले पाहिजेत. शिवसेना- भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीनं अधिकचा उमेदवार दिला नाही, त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध आणि खेळीमेळीच्या वातावरणात होत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.उद्धव ठाकरेंसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लढायची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढं करतात. तुम लढो हम कपडा संभालते है, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मला यावर भाष्य करायचं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.  सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, काँग्रेसनं देखील समंजस पणाची भूमिका घेतली त्याबद्दल धन्यवाद, असं शिंदेंनी म्हटलं. शिवसेनेतील काही नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाला विरोध केला असल्याचं समोर आलं होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तर, बच्चू कडू यांना उमेदवारी देत एकनाथ शिंदेंनी विदर्भात पक्षविस्ताराच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.

Comments are closed.